लातूर दि. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लातूर शहरातील महात्मा गांधी चौकात शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख तथा मा.आमदार रोहिदास चव्हाण, यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, ग्रामीण जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार विरोधात जन आक्रोश करण्यात आला.
महाराष्ट्र राज्यातील सरकारमधील कलंकीत मंत्र्याच्या विरोधात महात्मा गांधी चौक येथे तीव्र आंदोलन करत हातात फलक घेऊन मंत्र्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली या फलकावर महाराष्ट्रातील मंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्यात आला तर अघोरी पद्धतीने पूजा करून मंत्री ओम भट स्वाहा म्हणून महाराष्ट्र राज्यातील जनतेला भुलभुलय्या कसे करत आहेत याचे या फलकावर रेखाचित्र माडुंन तसेच मंत्रिमंडळातील एक मंत्री डान्सबार चालवतो दुसरा मंत्री पैशाच्या बॅगाजवळ ठेवून सिगारेट ओढतो तर तिसरा मंत्री विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्या ऐवजी रमी खेळतो, एकीकडे शेतकऱ्यांचे, मजुराचे, बेरोजगारांचे महाराष्ट्रातील जनतेचे बेहाल होत असताना मंत्री मात्र आपल्याच कारणाम्यात मशगूल आहेत म्हणून त्यांच्याविरुद्ध जनतेचा आक्रोश असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसे हतबल झाले आहेत याचाही लेखाजोखा शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या आंदोलनात फलकाच्या माध्यमातून मांडण्यात आला.
बाजार उठलाय घोटाळ्यांचा, खुर्चीवरून उठवा भ्रष्टाचारांना, कृषी मंत्री खेळतात रमी कुठे आहे विकासाची हमी, घरात बॅग पैशांची सत्ता आहे पन्नास खोक्यांची, बारच्या सावलीत बसले कोण काळ्या धंद्याचे पुढारी दोन, सरकार मधील भ्रष्टाचारांची हकालपट्टी झालीच पाहिजे, महाराष्ट्रातील मंत्री हनी ट्रॅप मध्ये अडकतात यापेक्षा दुर्दैव काय, सरकार हवंय न्यायचं नकोय दलाल लुटारुं सह अन्य शिवसैनिकांच्या हातातील फलक लक्ष वेधून घेत होते. शिवसैनिकांच्या वतीने फर्स्ट कलकींत मंत्र्याच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली यावेळी लातुर जिल्हा सहसंपर्क प्रमुख चंद्रनाथ मुरळीकर, नामदेव चाळक, उपजिल्हाप्रमुख बालाजी जाधव, महानगरप्रमुख सुनिल बसपुरे, महीला जिल्हा संघटक जयश्रीताई उटगे, सुनीताताई चाळक, शिवआरोग्य सेनेचे त्र्यंबक स्वामी, जिल्हा विस्तारक रवी पिचारे, युवा सेना जिल्हा युवा आधिकारी दिनेश जावळे , महानगरसंघटक माधव कलमुकले शहरप्रमुख विष्णुपंत साठे ,योगेश स्वामी, शंकर रांजनकर तालुकाप्रमुख अविनाश रेशमे, भारत सांगवीकर,कैलास पाटील, नंदकुमार पवार आबासाहेब पवार, भागवत वगे, परमेश्वर सूर्यवंशी, प्रशांत मोरे, दत्ता हेंगणे, किसन समुद्रे, जिल्हा कार्यलप्रमुख, अनिकेत फुलारी हेरीवाल सेनेचे हनुमंत पडवल, शहर सनमवयक विष्णू कांबळे, सचिन नळेगावकर, राजू कटारे,
महिला आघाडी रेखा पुजारी, श्रध्दा जवळगेकर दैवता सगर, रमेश माळी, रमेश पाटील,वैभव बिरादार, मारोती सावंत, एस.आर.चव्हाण,राहुल रोडे, शिवराज मुळावकर, मारोती सुर्यवंशी, संतोष रोडगे, सुरज बाहेती, प्रदिप उपासे, राहुल रोडे प्रकाश हैबतपुरे, गणेश माने,संतोष अदटराव,लहु बारवाड, आनील फुलारी,संदिप चौधरी, संजय उजळंबे, राजू घटमल, सुलभा शिंदे, अश्विनी सावळे, पल्लवी कुंभार, हेमलता पवार,वनमाला औताडे,आरुण बिरादार, गोविंद बेबंडे, व्यंकट साबणे,नितीन धुळशेटे, प्रदिप बनसोडे,भास्कर माने, प्रदिप उपासे, समद शेख, इक्बाल बागवाण, श्रद्धा जवळगेकर, राधाकृष्ण गंगणे, अजय गोणे कृष्णा जाधव,करण शिंदे, साधू मोरे, पिंटू कांबळे, लिंबाजी मोरे,महेश फूले,बबन फुलमंटे, गजानन येने,सह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते