*भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रेणापूरमध्ये पंचशील ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात साजरा*
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी सार्वजनिक जयंती अध्यक्ष मंडळ बौद्धनगर रेणापूर यांच्यातर्फे आपल्या रेणापूर शहरांमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. या निमित्त आज सकाळी प्रथम बौद्धनगर नगर समाज मंदिर समोर पंचशील ध्वजारोहण कार्यक्रम रेणापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब मा. श्री. सुधाकर देडे साहेब यांच्या हस्ते साजरा करण्यात आला. तदनंतर आंबेडकर चौक रेणापूर या ठिकाणी अध्यक्ष मंडळामार्फत अभिवंदन करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर पंचशील ध्वजारोहण कार्यक्रम जेस्ट सामाजिक कार्यकर्ते मा. श्री.उत्तमराव घोडके यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या स्वरूपात साजरा करण्यात आला. पंचशील ध्वजारोहण रेणापूर शहराच्या नगराध्यक्षा श्रीमती शोभाताई शामराव अकनगिरे यांच्या हस्ते साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष मा.श्री. रुपेश चक्रे हे होते तर प्रमुख पाहुणे रेणापूर नगरीचे माजी प्रथम नगराध्यक्ष तथा नगरसेवक मा.श्री.अभिषक अकनगिरे, राजू आतार, पंचायत समिती सभापती मोनिका रवी सूर्यवंशी, उप सभापती शरद दरेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उमाकांत खलंगरे, शहराचे नगरसेवक सचिन मोटेगावकर, शिवाजी पाटील, शेख वाहिद, कृष्णकांत मोटेगावकर, गणेश सौदागर, संतोष शिंदे, महेश गाडे, भूषण पनुरे, मोसिन शेख, रवी सूर्यवंशी, महानंदा दरेकर, डॉ.श्रीपती शिंदे, श्रीमंत नागरगोजे ,श्रीपाल बस्तापुरे, प्रल्हाद कोतवाड, शिवाजी अकनगिरे, सर्व पत्रकार बंधू श्री. विठ्ठल कटके, रफिक शिकलकर, चंद्रकांत कातळे, ईश्वर बद्दर, बाळ्या स्वामी, चंद्रकांत सूर्यवंशी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला पंचशील ध्वजारोहण कार्यक्रमामध्ये त्रिशरण पंचशील व बुद्ध वंदना प्रा. किशोर चक्रे यांनी घेतली ( भारतीय बौद्ध महासभा) सुरुवातीला आलेल्या मान्यवरांच्या हस्ते महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व जयंती अध्यक्ष मंडळाच्या वतीने सर्वांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये रेनापुर शहराचे माजी प्रथम नगराध्यक्ष अभिषेक अकनगिरे, रवी सूर्यवंशी, श्रीराम विद्यालय च्या शिक्षिका महानंदा दरेकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक प्रा. किशोर चक्रे यांनी केले तर आभार कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष रुपेश चक्रे यांनी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल कांबळे, शाम चक्रे,सुनील चक्रे,उत्तम चक्रे,अमोल चक्रे, विक्रम गायकवाड, धोंडीराम चक्रे,राजाभाऊ चक्रे,नितीन गायकवाड, राजाभाऊ घोडके, राजकुमार कांबळे,हनुमंत लांडगे,समाधान शिंदे अजय हनवते इत्यादी अध्यक्ष मंडळातील कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले