कोल्हापूर : पुणे कोल्हापूर बेंगलोर हायवे ते रत्नागिरी या महामार्गास जोडणाऱ्या शियेफाटा ते वडणगे या रस्त्याचे शिये ते भुयेवाडी पर्यंत काँक्रीट रस्त्याचे काम गेली चार-पाच महिने झाले काम सुरू असुन सदरचे काम संत गतीने सुरु असून रस्त्याच्या एका बाजूचे खोदकाम व रस्त्याचे काम सुरू आहे व दुसऱ्या बाजूस वाहतूक चालू आहे परंतु काही वेळेला सिंगल बाजूने डबल वाहन ये जा करतात त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे सध्या या रस्त्याला व टोप शिये दगडाची खाण व खडी क्रेशर मोठ्या प्रमाणात असून येथील मोठ्या डंपरची वाहतूक या रोडने होत असते तसेच हा रोड वाडी रत्नागिरी जोतिबा देवालयाकडेही जात आहे त्यामुळे या रस्त्यावरती वाहतूक वाढलेली आहे हा रस्ता अरुंद असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईड पट्टी नाही त्यामुळे बाजूला खोल भाग आहे व रस्त्याची उंची ही वाढलेली आहे त्यामुळे वाहन चालकांना त्रास होत आहे या रोडवरती साखर कारखान्याची ट्रॅक्टर व ट्रकची वाहतूक ही सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे रस्त्यावर वाहन चालवत असताना वाहन चालकांना व नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे तसेच या रस्त्याच्या संबंधित ठेकेदार यांनी दोन्ही बाजूला दिशा दर्शविण्यासाठी वाहन सोडण्यासाठी कर्मचारी उभे करावेत त्यामुळे वाहतूक सुरळीत होऊन कोणताही अपघात होणार नाही याची संबंधित ठेकेदाराने प्रशासनाने दक्षता घ्यावी असे अहवाल वाहन चालक व नागरिकातून होत आहे.