कोल्हापूर; पुणे बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे किणी टोल नाका ते कोगणोळी टोल नाका दरम्यान महामार्गाचे काम सुरू असून गेली बरेच दिवस होऊन गेले रस्त्याच्या कामाला गती नाही जागो जागी पुलाचे काम अर्धवट स्थितीत आहे कोणत्याही एका बाजूचे काम पूर्ण झालेले दिसत नसेल प्रत्येक ठिकाणी अर्धवट अर्धवट काम सुरू आहे या रस्त्यावरून कोल्हापूर शहरात आसपासच्या गावातून जिल्ह्यातील गावातून शाळा महाविद्यालय साठी विद्यार्थी तसेच आसपासच्या एरियामध्ये साखर कारखाने सुद्धा आहेत तसेच शिरोली कागल गोकुळ शिरगाव येथे एमआयडीसी असलेले मोठे मोठे उद्योगधंदे या भागात आहेत या रस्त्यावरून एमआयडीसीचीही कर्मचारी इंडस्ट्रियल कंपन्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे हा रस्ता गेले दीड वर्ष पासून काम सुरू आहे परंतु सदर रस्ता कोणत्याही एका बाजूने पूर्ण झालेला दिसत नाही दोन्ही बाजूने अपूर्ण कामे अर्धवट स्थितीत दिसत आहे कोल्हापूर शहर हे महाराष्ट्र राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य व महत्त्वाचे शहर असून या शहरांमध्ये व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळ व तीर्थक्षेत्र असून दररोज या शहरांमध्ये महाराष्ट्र मधून व इतर राज्यायातून भाविक व पर्यटक वाहनाच्या माध्यमातून येत आहेत तसेच कोल्हापूर पासून जवळच कागल गोकुळ शिरगाव व पुलाची शिरोली येथे मोठ्या प्रमाणात एमआयडीसी सुरू असून या रोडवरती मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते तसेच या रस्त्यावरून कोल्हापूर शहरात ये जा करत असताना रहदारीमुळे वाहन चालकांना तासंतास तारेवरची कसरत करावी लागत आहे अशा अर्धवट कामामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून प्रशासनाने या बाबतीत लक्ष घालून हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावा अशी मागणी वाहन चालक व नागरिकांतून केली जात आहे.