कोल्हापूर: पुणे बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे गेले दीड वर्ष या रस्त्याचे काम सुरू असून प्रत्येक ठिकाणी कामे अर्धवट स्थितीत सुरू असून कोणत्याही ठिकाणी काम पूर्ण झालेले दिसत नाही कोल्हापूर जिल्हा हद्दीमध्ये किनी टोल नाका ते कोगणोळी टोल नाका दरम्यान या महामार्गावर जागोजागी अर्धवट रस्त्याचे व पुलाचे काम सुरू आहे कोणत्याही एका बाजूचेपूर काम पूर्ण झालेले दिसत नाही त्यामुळे वाहनचालक व सामान्य नागरिकातून संताप व्यक्त केला जात आहे कोल्हापूर शहर हे पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे अग्रगण्य शहर असून या शहराला बाहेरील जिल्ह्यातून व राज्यातील मोठ्या प्रमाणात वाहनांची ये जा सुरू आहे कोल्हापूर मध्ये पर्यटन स्थळ व तीर्थक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे महाराष्ट्रसह इतर राज्यातून ही भाविकांची देवदर्शनासाठी दररोज ये जा सुरु आहे तसेच जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात साखर कारखाने तसेच कागल, गोकुळ, शिरगाव पुलाची शिरोली येथे मोठ्या प्रमाणात एमआयडीसी चे कारखाने सुद्धा आहेत त्यामुळे या महामार्गावरून सर्वांनाच वाहतूक करावी लागते या वाहतुकीमुळे रहदारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून कोल्हापूर शहराच्या बाहेर या रस्त्यावर ये जा करत असताना रहदारीमुळे वाहन चालकांना तासंतास तारेवरची कसरत करावी लागत आहे अशा अर्धवट कामामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे या महामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण व्हावे यामध्ये प्रशासनाने लक्ष घालावे असे नागरिकातून व वाहन चालकातून विचारना होत आहे.